Punjab Election : 'आम आदमी' शेर; या 5 दिग्गज झाले ढेर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Punjab Election Result

Punjab Election : 'आम आदमी' शेर; 5 दिग्गज झाले ढेर

Punjab Election Result : देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने निर्वावाद वर्चस्व राखले. आप नावाच्या वादळानं पंजाबमध्ये भल्या भल्या दिग्गजांच्या पदरी पराभवाचा सामना करावा लागला. पंजाबमधील विद्यमान मुख्यमंत्र्यासंह माजी मुख्यमंत्री आणि अकाली दलाच्या प्रमुखांसह काँग्रेसच्या नवजोत सिंह सिद्धू यांनाही पराभवाचा दणका बसला आहे. जाणून घेऊयात पाच दिग्गज नेते ज्यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला.

1 सुखबीर बादल

पंजाब विधानसभा (Punjab Assembly Election) निवडणुकीत शिरोमणी अकाली दलाचे (SAD) प्रमुख आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल (Sukhbir Singh Badal) यांना पराभवाचा सामना करावा लागला. बादल यांना जलालाबाद विधानसभा मतदार संघातून आम आदमी पार्टीचे जगदीप कंबोज यांनी 23310 मतांनी पराभूत केले. कंबोज यांना 74226 एवढी मते पडली. तर सुखबीर सिंग बादल यांना 48749 मते मिळाली.

2 कॅप्टन अमरिंदर सिंग

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग पटियाला अर्बन मतदारसंघातून पराभूत झाले. 'कॅप्टन'समोर आम आदमी पार्टीचे उमेदवार अजित पाल सिंग भारी ठरले. त्यांना 19,873 मतांनी पराभव झाला. कॅप्टन काँग्रेसपासून वेगळा पक्ष स्थापन करून निवडणूक लढवली होती.

हेही वाचा: पंजाबमध्ये सोनू सूदची लोकप्रियता फिकी; बहिण मालविका सूद मोठ्या फरकाने पराभूत

हेही वाचा: भाजपने चार राज्ये जिंकली, एका ठिकाणी आजी-माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव

3 पंजाबचे विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी

पंजाबचे विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यावर तर दोन मतदारसंघांमध्ये पराभवाची नामुष्की ओढवली. चमकौर साहिब आणि भदौर अशा दोन मतदारसंघांमधून ते निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. मोबाईलच्या दुकानात काम करणाऱ्या लाभ सिंग नावाच्या आपच्या उमेदवाराने त्यांना दणका दिला.

हेही वाचा: कॉमेडीयन ते आमदार: निवडणुकीत बाजी मारणाऱ्या 'आप'च्या भगवंत मान यांचा प्रवास

नवजोत सिंग सिद्धू

अमृतसर पूर्व मतदार संघातून नवजोत सिंग सिद्धू यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. सिद्ध यांचा 6,750 मतांनी पराभूत झाले. अमृतसर पूर्व मतदार संघातून नवजोत सिंग सिद्धू यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. सिद्ध यांचा 6,750 मतांनी पराभूत झाले. आम आदमी पार्टीच्या जीवनजोत कौर यांनी बाजी मारली. कौर यांना 39520 मते मिळाली.

विक्रमसिंग मजिठिया

पंजाबमधील निवडणुकीपूर्वी अकाली दलाचे विक्रमसिंह मजिठिया आणि नवजोत सिंग सिद्धू यांच्यात सामना रंगल्याचे पाहायला मिळाला होता. अमृतसर पूर्व मतदार संघात या दोघांमध्ये टक्कर होईल, असेही चित्र निर्माण झाले. पण विक्रमसिंग यांना तिसऱ्या क्रमांकावर रहावे लागले. त्यांना 23112 मते पडली.

Web Title: Punjab Election Result Aam Adami Party King Captain Amarinder Singh Channi Navjot Singh Sidhu Loss Seats

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top