
पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आज मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करू शकते. यासाठी विद्यमान मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी किंवा राज्य युनिटचे प्रमुख नवज्योत सिंग सिद्धू यांचे नाव पुढे येऊ शकते. दरम्यान, आम आदमी पार्टीचे (आप) बंडखोर आमदार कंवर संधू यांनी माजी पीसीसी सुनील जाखड (Sunil Jakhar) यांनी राजकारणातून निवृत्ती घेतल्याचा दावा केला आहे.
खरार विधानसभा मतदारसंघाचे (Assembly Election) आमदार कंवर संधू यांनी ट्विट केले, पंजाबमधून अनेक दुर्दैवी बातम्या येत आहेत. नुकतेच ऐकले की सुनील जाखड (Sunil Jakhar) त्यांच्या सहकाऱ्यांच्या अनियंत्रित आणि बेजबाबदार वक्तव्यामुळे राजकारण सोडत आहेत. एका सज्जन राजकारण्याने निवडणुकीच्या तोंडावर राजकारण सोडणे वाईट वाटले, असेही त्यांनी म्हटले.
सुनील जाखड हे चांगले व्यक्ती आहे. त्यांच्याशी दीर्घकाळापासून मैत्री आहे. आशा आहे की ते सक्रिय राजकारण सोडण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करेल आणि आम्हाला त्यांच्या विनोदी शैलीची ओळख करून देईल. त्यांच्या काव्यात्मक ज्ञानाचा आम्हाला फायदा होत राहील, असेही संधू म्हणाले.
मी मुख्यमंत्री व्हावे अशी ४२ आमदारांची इच्छा
काही दिवसांपूर्वी सुनील जाखड यांनी दावा केला होता की, गतवर्षी अमरिंदर सिंग यांची हकालपट्टी झाल्यानंतर ४२ आमदारांनी मी मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती. सुनील जाखर (Sunil Jakhar) यांना ४२ मते, सुखजिंदर रंधावा यांना १६ मते, महाराणी प्रनीत कौर (अमरिंदर सिंग यांच्या पत्नी आणि पतियाळा येथील खासदार) यांना १२ मते, नवज्योतसिंग सिद्धू यांना सहा मते आणि (चरणजीत सिंग) चन्नी यांना दोन मते पडल्याचे जाखड म्हणाले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जाखड यांना उपमुख्यमंत्री बनवण्याची ऑफर दिली होती. परंतु, त्यांनी ती नाकारली होती. सुनील जाखड (Sunil Jakhar) मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. मात्र, पक्षाने चरणजित सिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांना पसंती दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.