esakal | Budget 2021 : "मोदींच्या नेतृत्वात अर्थमंत्र्यांनी मांडलेलं बजेट महत्वाकांक्षी आणि आत्मनिर्भर भारताचं"
sakal

बोलून बातमी शोधा

Budget 2021 : "मोदींच्या नेतृत्वात अर्थमंत्र्यांनी मांडलेलं बजेट महत्वाकांक्षी आणि आत्मनिर्भर भारताचं"

"भल्यामोठ्या आव्हानात अर्थव्यवस्थेवर कोणताही परिमाण होणार नाही, याची काळजी घेत बजेट सादर करण्यात आलं."

Budget 2021 : "मोदींच्या नेतृत्वात अर्थमंत्र्यांनी मांडलेलं बजेट महत्वाकांक्षी आणि आत्मनिर्भर भारताचं"

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : मोदींच्या नेतृत्वात अर्थमंत्र्यांनी मांडलेलं बजेट महत्वाकांक्षी आणि आत्मनिर्भर भारताचं बजेट आहे. भल्यामोठ्या आव्हानात अर्थव्यवस्थेवर कोणताही परिमाण होणार नाही, याची काळजी घेत बजेट सादर करण्यात आलं. आरोग्य, आर्थिक सुधारणा, मानवसंसाधन, नवनवीन संशोधन मिळून आजचा 6 सूत्री अर्थसंकल्प आहे. 

आज सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प २०१३ - २०१४ च्या तुलनेत पाच पटीने अधिक आहे.  बाजारसमित्या बंद करण्याची ओरड करणाऱ्यांचे च्या हा अर्थसंकल्प तोंड बंद करणारा असा आजचा अर्थसंकप आहे. हमीभावाच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण करणाऱ्यांचा तोंडबंद करण्यासारकाही प्रचंड प्रचंड मोठी आजच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. 

Budget 2021: संजय राऊतांनी सुनावले,  देशाचे बजेट की पक्षाचे बजेट होते

सर्व प्रकारच्या कामगारांना किमान वेतन उपलब्ध होणार, असंघटित काम करणाऱ्या मजुरांना याचा फायदा होणार, देशाच्या इतिहासातील पहिल्यांदाच अशी तरतूद करण्यात आली आहे. 

कोरोनानंतर आरोग्य विभागाचे अधिक सक्षमीकरण होणार आहे. आरोग्य विभागासाठीचा खर्च खर्च १३१ % वाढवण्याचा निर्णय आजच्या अर्थसंकल्पत प्रस्तावित आहे. प्रधानमंत्री स्वास्थ्य योजनेअंतर्गत २८ प्राथमिक आरोग्य केंद्र अत्याधुनिक करण्यात येणार आहे.

पिण्याच्या पाण्याकरीता आता जल अभियान ग्रामीण भागात बरोबर शहारत देखील राबवलं जाणार आहे. येत्या काळात पायाभूत सुविधांवर अभूतपूर्व खर्च केले जाणार आहेत. 

देशात प्रचंड मोठी रोजगार निर्मिती होणार आहे. देशात 1 कोटी रोजगाराच्या संधी निर्माण होतील. त्याचसोबत शिक्षण क्षेत्रात New Education पॉलिसीची सुरुवात करण्यात येणार आहे. 

Budget 2021 : स्टार्टअपला चालना देण्यासाठी निर्मला सीतारामण यांच्याकडून महत्त्वाचं पाऊल, केली मोठी घोषणा

बजेटनंतर देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेले आणखीन काही महत्त्वाचे मुद्दे  

  • महाराष्ट्राच्या GSDP सगळ्यात जास्त असल्यामुळे महाराष्ट्राला सगळ्यात जास्त फायदा होईल
  • Tax रीजम संपवण्यात येईल
  • 35 हजार कोटी देशभरात लसीकरणासाठी ठेवण्यात आले आहेत.
  • नाशिक मेट्रोसाठी  केंद्रानं मंजुरी दिली आहे. येत्या काळात देशात मेट्रोचं जाळं सर्व शहरांत पसरेल
  • बजेट सादर होण्यापूर्वी विरोधकांनी वाक्य लिहून ठेवली होती, आता ती बोलून दाखवली
  • नागपूरचा प्रस्ताव अमच्या सरकारच्या काळात गेला होता, म्हणून झालंय
  • मुंबईच्या प्रकल्पामध्ये यांनीच खोडा घातलाय

union budget 2021 reaction of ex cm of maharashtra devendra fadanavis

loading image
go to top