esakal | Budget 2021 : "सर्वसामान्य जनतेला मोदी है तो मुमकीन है हा विश्वास देणारा सर्वस्पर्शी अर्थसंकल्प" : सुधीर मुनगंटीवार
sakal

बोलून बातमी शोधा

Budget 2021 : "सर्वसामान्य जनतेला मोदी है तो मुमकीन है हा विश्वास देणारा सर्वस्पर्शी अर्थसंकल्प" : सुधीर मुनगंटीवार

"जानेवारी २०२१  मध्ये १.२० लाख कोटी रुपये आजपर्यंतचा रेकॉर्ड ब्रेक जीएसटी कलेक्शन झालं आहे."

Budget 2021 : "सर्वसामान्य जनतेला मोदी है तो मुमकीन है हा विश्वास देणारा सर्वस्पर्शी अर्थसंकल्प" : सुधीर मुनगंटीवार

sakal_logo
By
विनोद राऊत

मुंबई : कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटावर मात करत त्यातून संधी शोधत भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचा संकल्प करत त्या संकल्पपूर्तीसाठी पावले उचलणारा सर्वस्पर्शी अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी लोकसभेत सादर केला. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांची आत्मनिर्भर भारत ही संकल्पना सार्थ ठरविणारा हा अर्थसंकल्प सर्वसामान्य जनतेला मोदी है तो मुमकीन है हा विश्वास देणारा असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार  यांनी व्यक्त केली आहे.

Budget 2021 : स्टार्टअपला चालना देण्यासाठी निर्मला सीतारामण यांच्याकडून महत्त्वाचं पाऊल, केली मोठी घोषणा

जानेवारी २०२१  मध्ये १.२० लाख कोटी रुपये आजपर्यंतचा रेकॉर्ड ब्रेक जीएसटी कलेक्शन झालं आहे. GST लागू झाल्यानंतर आजपर्यंतचा हा सर्वाधिक कलेक्शन आकडा आहे. लॉकडॉउनमध्ये छोटे मोठे उद्योगधंदे बंद पडलेत, नोकऱ्या गेल्यात असं म्हणणाऱ्यांसाठी मोठी चपराक आहे. या काळात नोकरी टिकवणं खूप अवघड झालं होतं, अशातच संकटातून संधीही निर्माण झालेल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने MSME ला प्रोत्साहन देत देशातील बेरोजगारी दूर करण्यासाठी मोठं योगदान दिले आहे. विशेषतः महाराष्ट्रात सर्वाधिक MSME ने मोठ्या प्रमाणात कर्ज तरुणांना दिले आहे. उद्योग, कृषी, पायाभूत सुविधा अशा सर्वच क्षेत्रांसाठी भरीव आर्थिक तरतूद करत महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी सुद्धा ठोस पावले या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून उचलली गेली आहे. 

Budget 2021 : "मोदींच्या नेतृत्वात अर्थमंत्र्यांनी मांडलेलं बजेट महत्वाकांक्षी आणि आत्मनिर्भर भारताचं"

नागपूर आणि नाशिक येथील मेट्रोसाठी मोठी तरतूद करण्यात आलेली आहे. पुन्हा या देशाला प्रगतीपथावर नेण्याचा संकल्प करत त्या दृष्टीने केलेले संकल्प आश्वासक आणि तमाम देशवासियांना दिलासा देणारे असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. या सर्वस्पर्शी अर्थसंकल्पासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचे सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे.

union budget 2021 reaction of sudhir mungantiwar after FM Nirmala Sitharamns budget speech

loading image
go to top