
सुहास राजदेरकर - ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार
भांडवल बाजार नियामक ‘सेबी’ला कायदेशीर दर्जा मिळाल्यापासून मागील ३० वर्षांमध्ये, म्युच्युअल फंड उद्योगात अनेक स्वागतार्ह आणि गुंतवणूकदारांच्या हिताचे बदल झाले. त्यामुळेच आज जेव्हा भारताची अर्थव्यवस्था जपानला मागे टाकून जगातील चौथी बलाढ्य अर्थव्यवस्था बनली आहे, त्यामध्ये साधारण ६७ लाख कोटी रुपये एकूण मालमत्ता असलेल्या म्युच्युअल फंडांचे मोठे योगदान आहे.