

Justice Ranjana Prakash Desai
esakal
8th Pay Commission fitment factor demand: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आठव्या वेतन आयोगाशी संबंधित विषयांच्या दिल्लीमध्ये मॅरेथॉन बैठका सुरु झाल्या आहेत. पुढचे दोन दिवस बैठकांचे सत्र चालणार असून अनेक महत्त्वाचे मुद्दे चर्चिले जाणार आहेत. या बैठका १० ऑगस्टपर्यंत नियोजित करण्यात आलेल्या आहेत.
दिल्लीत होणाऱ्या या बैठका अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत, कारण आयोगाने आपल्या नियत कार्यकाळातील एक मोठा टप्पा पूर्ण केला आहे. आयोगाने या बैठकांचा कोणताही अधिकृत अजेंडा सार्वजनिक केला नसला, तरी प्रामुख्याने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांशी संबंधित ज्वलंत मुद्द्यांवरच विचारविनिमय होत आहे.