

8th Pay Commission
esakal
केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये सध्या ८ व्या वेतन आयोगाबाबत सर्वाधिक चर्चा फिटमेंट फॅक्टर आणि वार्षिक वेतनवाढीच्या दराची सुरू आहे. कर्मचारी संघटनांकडून एकीकडे जास्त फिटमेंट फॅक्टरची मागणी केली जात आहे, तर दुसरीकडे वार्षिक इंक्रीमेंटचा दर वाढवण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. या दोन्ही घटकांचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावर होतो.