
Adani Ports Stock: Emerging Strong from the Hindenburg Storm.
Sakal
मकरंद विपट - ‘सेबी’ रजिस्टर्ड रिसर्च अॅनालिस्ट
अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन ही अदानी समूहाची कंपनी बंदरांचा पायाभूत सुविधांचा विकास, संचालन आणि देखभाल या व्यवसायात आहे. तिने मुंद्रा बंदर आणि त्याला लागून असलेल्या बहु-उत्पादन विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) आणि संबंधित पायाभूत सुविधांना जोडले आहे. जानेवारी २०२३ मध्ये हिंडेनबर्ग या कंपनीने अदानी ग्रुपच्या बऱ्याच कंपन्यांवरती गैरव्यवहाराचे आरोप केले होते. त्यामुळे अदानी ग्रुपमधील सर्व कंपन्यांमध्ये मोठी घसरण पाहण्यात आली होती. अदानी पोर्टच्या शेअरमध्येही मोठी घसरण झाली होती. जानेवारी २०२३ मध्ये या शेअरने चारशे रुपयांची नीचांकी पातळी दाखवली होती.