अर्थबोध : आदिसॉफ्ट टेक्नॉलॉजीज ‘आयपीओ’ कसा आहे?

आदिसॉफ्ट टेक्नॉलॉजीजच्या एसएमई आयपीओकडे गुंतवणूकदारांचे लक्ष; मजबूत आर्थिक कामगिरी, पण उच्च मूल्यांकन आणि क्लायंट कॉन्सन्ट्रेशनमुळे जोखीम वाढलेली
Adisoft Technologies SME IPO: Everything Investors Need to Know Before Monday

Adisoft Technologies SME IPO: Everything Investors Need to Know Before Monday

Sakal

Updated on

नंदिनी वैद्य, ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार

पुणे येथील आदिसॉफ्ट टेक्नॉलॉजीज लि.चा एसएमई आयपीओ सोमवार, २७ एप्रिलपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा ७४ कोटी रुपयांचा आयपीओ असून, त्यासाठीचा किंमतपट्टा १६३-१७२ रुपये आहे. एसएमई आयपीओ असल्यामुळे छोट्या गुंतवणूकदारांना कमीत कमी १६०० शेअरसाठी (रु. २,७५,२००) अर्ज करावा लागणार आहे. कंपनीचा व्यवसाय प्रामुख्याने वाहन क्षेत्राशी निगडित आहे. ती डिजिटल ऑटोमेशन सोल्यूशन्स देण्याचे काम करते. ऑटोमेटेड असेंब्ली लाइन्स, मटेरिअल हँडलिंग मशीन्स, रोबोटिक वर्क सेल्स आणि विशेष मशीनरीशी संबंधित डिझाइनिंग, डेव्हलपमेंट, असेंब्लिंग, टेस्टिंग अशा प्रकारच्या अभियांत्रिकी सेवा कंपनी देते. आयपीओमधून मिळणाऱ्या निधीचा वापर कर्ज परतफेड, व्यवसायविस्तार आणि खेळत्या भांडवलाशी निगडित गरजांसाठी केला जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com