

Macro Capital Inflows: Analyzing Maharashtras Dominant 30% Asset Contribution Slabs
Sakal
मुकुंद लेले, संपादक, ‘सकाळ मनी’
महाराष्ट्रातील उदयोन्मुख शहरांमध्ये म्युच्युअल फंड गुंतवणुकीबाबतची जागरूकता वेगाने वाढत असून, येथील गुंतवणूकदार भारताच्या ‘ग्रोथ-स्टोरी’चा महत्त्वाचा भाग बनत आहेत, असे मत आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसीचे (म्युच्युअल फंड) व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बालसुब्रमणियन यांनी व्यक्त केले. ‘सकाळ मनी’साठी दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्रातील वाढत्या गुंतवणूक संस्कृतीपासून ते भारताच्या आर्थिक भवितव्यापर्यंत विविध विषयांवर भाष्य केले. त्याचा हा संक्षिप्त गोषवारा.