

Mutual Funds
esakal
आपली आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक हा उत्तम परतावा देणारा गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहे. त्यातही सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे (एसआयपी) दरमहा गुंतविण्याचा मार्ग उपलब्ध असल्याने गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांकडे वळत आहेत. ‘एसआयपी’मुळे शेअर बाजारातील जोखीम आणि परताव्याचा समतोल साधला जातो. अस्थिरतेत वैविधीकरणाचे धोरण अवलंबल्यास उत्तम परतावा मिळणे शक्य होते, ती संधी म्युच्युअल फंडामुळे मिळू शकते. म्युच्युअल फंड गुंतवणुकीबाबतच्या विविध मुद्द्यांवर बजाज फिनसर्व्ह एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक गणेश मोहन यांची ‘सकाळ मनी’साठी विशेष मुलाखत...
प्रश्न ः काही महिन्यांपूर्वी शेअर बाजार अस्थिर होता; पण अलीकडे स्थिर होत तेजीकडे जाताना दिसत आहे. अशा काळात, गुंतवणूकदारांनी परतावा आणि जोखीम यामधील समतोल साधण्यासाठी कोणती गुंतवणूक धोरणे निवडली पाहिजेत?
गणेश मोहन ः शेअर बाजारातील चढ-उतार हे गुंतवणुकीचा मूलभूत भाग आहेत. अशा काळात संतुलित आणि विविध प्रकारांमध्ये विभागलेले पोर्टफोलिओ असणे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव होते. बाजार भांडवलाचे वेगवेगळे स्तर, विविध क्षेत्रे आणि संपत्तीचे प्रकार यामध्ये गुंतवणूकवाटप केल्यास जोखीम कमी करता येते आणि बाजारातील विविध भागांमधून वाढीच्या संधी मिळवता येतात. भारत ही सर्वांत वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. मजबूत देशांतर्गत खप, धोरणात्मक पाठिंबा आणि चालू आर्थिक वर्षात सुमारे ६.३ ते ६.८ टक्के इतकी अपेक्षित ‘जीडीपी’ वाढ यामुळे भारतात दीर्घकालीन गुंतवणुकीच्या चांगल्या संधी आहेत. अशा परिस्थितीत चांगले विविधीकरण असलेले गुंतवणूकधोरण गुंतवणूकदारांना बाजारातील चढ-उतारांदरम्यान स्थिर राहण्यास मदत करते आणि दीर्घकालीन वाढीचा लाभ घेण्याची संधीही देते.