
सणासुदीच्या आधी घर खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. देशातील सर्वात मोठी कर्ज देणारी बँक एसबीआय नंतर आता युनियन बँकेनेही नवीन ग्राहकांसाठी गृहकर्जावरील व्याजदर वाढवले आहेत. एसबीआयने नवीन गृहकर्ज दर २५ बेसिस पॉइंट्स (बीपीएस) ने वाढवले आहेत. आता नवीन दर ७.५०% ते ८.७०% दरम्यान असतील. कमी क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांना जास्त व्याजदर द्यावे लागतील.