स्मार्ट माहिती : आयटी व्यवस्थापन आणि गुंतवणूकदार यांच्यात दरी

एआयच्या गाजावाज्यात आयटी कंपन्यांची आर्थिक कामगिरी आणि गुंतवणूकदारांच्या अपेक्षांमध्ये वाढती दरी, महसूल-वाढ व नफ्याच्या गुणवत्तेकडे लक्ष
A representative image showing the growing gap between AI-driven expectations of IT companies and investors' focus on actual financial performance.

A representative image showing the growing gap between AI-driven expectations of IT companies and investors' focus on actual financial performance.

Sakal

Updated on

अतुल कहाते, तंत्रज्ञान विषयाचे अभ्यासक-विश्‍लेषक

गेल्या दोन-तीन वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हा शब्द आयटी उद्योगाच्या प्रत्येक चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. जगभरातील कंपन्या ‘एआय’मध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. विविध अहवालांनुसार, वर्ष २०३० पर्यंत ‘एआय’ बाजारपेठेचा आकार १.५ लाख कोटी अमेरिकी डॉलरपेक्षा जास्त होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. भारतातील आयटी सेवा उद्योगाचा वार्षिक महसूल सुमारे २८० अब्ज अमेरिकी डॉलर असून, त्यात ५० लाखांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे ‘एआय’चा सर्वाधिक परिणाम होणार असेल, तर तो या उद्योगावरच होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com