फिनटेक : ‘एआय’चा तडाखा!

एआयमुळे फिनटेकसह अनेक स्टार्टअप्स आणि पारंपरिक कंपन्यांचे व्यवसाय मॉडेल डळमळीत; गुंतवणुकीपूर्वी तंत्रज्ञानाचा दीर्घकालीन परिणाम ओळखण्याची तातडीची गरज
The AI Disruption: How Generative AI is Killing Traditional Startups

The AI Disruption: How Generative AI is Killing Traditional Startups

sakal

Updated on

अतुल कहाते, तंत्रज्ञान अभ्यासक-विश्‍लेषक

‘ए आय’चा वापर करून अनेक ‘स्टार्ट-अप’ तयार होऊ शकतात, असे काही लोक म्हणतात. यात निश्चितच तथ्य आहे. आतापर्यंत अशक्यप्राय वाटत असलेल्या अनेक गोष्टी ‘एआय’मुळे नुसत्या शक्यच नव्हे, तर सहजसाध्य झाल्या आहेत. याच्याच जोडीला ‘एआय’मुळे अनेक उद्योगांवर येत असलेल्या महासंकटाविषयी मात्र पुरेसे बोलले जात नाही. हळूहळू अशा प्रकारे स्वत:चा उद्योग सुरू केलेले अनेक जण याविषयी व्यक्त होताना दिसतात. माहितीचे पृथक्करण करणे, डिजिटल मार्केटिंग, वेबसाइटशी संबंधित असलेली कामे, जाहिराती, लिखाणाशी संबंधित असलेली कामे, कलात्मक किंवा रचनेशी संबंधित असलेल्या गोष्टी, हिशेब ठेवणे किंवा त्याच्याशी संबंधित असलेली कामे, करारपत्रके, कायदेशीर बाबी, असंख्य बाबतींमधील सल्ले (उदा. गुंतवणूक सल्लागार, विमा सल्लागार), सॉफ्टवेअर तयार करणे, माहिती (‘कंटेंट’) तयार करणे या आणि अशा प्रकारच्या कामांसाठी हळूहळू पैसे खर्च न करता ‘एआय’चा वापर करण्याचे प्रमाण वाढताना दिसते.

इरा बॉडनर या होतकरू तरुणीने ‘क्लॉड’ या ‘एआय’ तंत्रज्ञानामुळे आपली जोमात सुरू झालेली ‘स्टार्ट-अप’ अक्षरश: रातोरात कशी कवडीमोल झाली, याचे वर्णन करणारा संदेश ‘एक्स’ (आधीचे ‘ट्विटर’) या समाजमाध्यमावर टाकला आणि तो तब्बल ५४ लाख लोकांनी वाचला! अलीकडे अशा प्रकारची वर्णने अधिकाधिक प्रमाणात वाचायला मिळतात.

चॅट-जीपीटी, गुगल जेमिनी, ॲ‍न्थ्रॉपिक क्लॉड या विविध प्रकारच्या ‘एआय’ तंत्रज्ञानांमध्ये दिवसागणिक होत असलेल्या सुधारणांमुळे हे घडते आहे. एखादी स्टार्ट-अप नवकल्पना घेऊन जे काम हाती घेते आणि तिच्यामध्येच ते करू शकण्याचे कौशल्य असल्याचे सुरुवातीला जाणवते; ते काम काही काळातच ‘एआय’ अगदी चुटकीसरशी करताना दिसते.

आता तर हा प्रकार फक्त स्टार्ट-अप कंपन्यांपुरताच मर्यादित नसून, तो सार्वत्रिक होताना दिसतो. ॲ‍न्थ्रॉपिक कंपनीने अलीकडे तयार केलेल्या ‘क्लॉड मायथॉस’ या तंत्रज्ञानामुळे माहितीच्या सुरक्षिततेच्या क्षेत्रात पाय घट्ट रोवून बसलेल्या नॉर्टन, मॅकफी, बिटडिफेंडर, एव्हीजी, ट्रेंड मायक्रो अशा कंपन्यांचे शेअर धोक्यात येण्याविषयी ‘नॅस्डॅक’मध्ये चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी ‘क्लॉड कोड’; तसेच ‘गितहब कोपायलट’मुळे सॉफ्टवेअर लिहीत असलेल्या कंपन्यांच्या शेअरची तुफान विक्री झालेली आहे. साहजिकच, आर्थिक गुंतवणूक करत असतानासुद्धा ‘एआय’चा परिणाम संबंधित क्षेत्रावर किंवा कंपन्यांवर नेमका कसा होऊ शकतो, याचा नेमका आढावा घेऊन मगच त्यासाठी आवश्यक असलेली पावले टाकावीत, असा सावधगिरीचा इशारा नक्कीच द्यावासा

वाटतो!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com