

AI Boom Faces New Challenges as Interest Rate Hike Concerns Raise Questions About Tech Stock Valuations and Investor Confidence
sakal
अतुल कहाते, तंत्रज्ञान विषयाचे अभ्यासक-विश्लेषक
अमेरिकेतील शेअर बाजारात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ‘एआय’शी संबंधित कंपन्यांची गेल्या काही वर्षांत जोरदार घोडदौड झाली आहे. मायक्रोसॉफ्ट, एनव्हिडिया आणि ॲपलसारख्या मोठ्या कंपन्यांच्या शेअरचे भाव वाढल्यामुळे नॅस्डॅकसारख्या निर्देशांकांनाही मोठी चाल मिळाली. ‘एआय’मुळे या कंपन्यांचा नफा भविष्यात मोठ्या प्रमाणात वाढेल, अशी गुंतवणूकदारांची अपेक्षा आहे. मात्र, आता या तेजीसमोर एक महत्त्वाचे आव्हान उभे राहिले आहे. ते म्हणजे अमेरिकेतील व्याजदर आणि सरकारी रोख्यांवरील परतावा. सोप्या भाषेत सांगायचे, तर अमेरिकेचे सरकार कर्ज घेण्यासाठी बाँड म्हणजे सरकारी रोखे विकते. या रोख्यांमध्ये पैसे गुंतवल्यावर गुंतवणूकदाराला उत्पन्न मिळते. या उत्पन्नाचा दर म्हणजे बाँड यिल्ड. हा दर वाढला, की तुलनेने सुरक्षित सरकारी रोख्यांमधूनही चांगला परतावा मिळू शकतो.