

From Innovation to Competition: The Fierce Fight for AI Leadership
sakal
-अतुल कहाते, तंत्रज्ञान विषयाचे अभ्यासक-विश्लेषक
एआय’च्या सॉफ्टवेअरशी संबंधित असलेल्या कंपन्यांचा विचार केला, तर सध्या ‘ओपन एआय’, ‘ॲन्थ्रॉपिक’ आणि ‘गुगल’ या तीन कंपन्या आघाडीवर आहेत. या तिन्ही कंपन्यांचे सतत एकमेकावर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू असतात. ‘ओपन एआय’ या कंपनीने ‘एआय’च्या विश्वात आपल्या चॅट जीपीटीमुळे घेतलेली आघाडी आजही जवळपास शाबूत असली, तरी ‘क्लॉड’ या आपल्या सनसनाटी सॉफ्टवेअरच्या जोरावर ‘ॲन्थ्रॉपिक’ने निर्माण केलेले वादळ सनसनाटी आहे.