Air India Express Launches Pay-Day Sale with Big Discounts on Flights
Sakal
Pay Day Sale Offers : विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आली आहे. एअर इंडिया एक्सप्रेसने आपली मासिक पे-डे सेल सुरु केली आहे. यात देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासाची तिकिटांच्या किमतीवर सूट देण्यात आली आहे. कंपनीने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, देशांतर्गत उड्डाणांची तिकिटे १,९५० रुपयांपासून, तर आंतरराष्ट्रीय उड्डाणांची तिकिटे ५,५९० रुपयांपासून सुरू होत आहेत.