

Amazon Layoffs
Sakal
Amazon to Lay Off 16,000 More Employees : अमेरिकन टेक जायंट अमेझॉनने बुधवारी घोषणा केली की ते त्यांच्या ग्लोबल वर्कफोर्समधून १६ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहेत. कंपनीची ही तीन महिन्यांतील दुसरी मोठी कपात आहे. महामारीच्या काळात अधिकच्या भरतीनंतर पुनर्रचना केली जात आहे आणि एआय टूल्स स्वीकरण्याचा विचार करत आहे.
या कपातीच्या अमेझॉन वेब सर्व्हिसेस, रिटेल, प्राइम व्हिडिओ आणि एचआर विभागातील कर्मचाऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सीएनबीसीच्या अहवालानुसार, अमेझॉनने गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या अखेरीस १४ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते.
सीईओ अँडी जेसी यांनी कंपनीसाठी ऑपरेशनल लेव्हल कंपनीच्या गरजेवर भर दिला होता, विशेषतः ऑपरेशनल लेव्हल कमी करून आणि व्यवस्थापकांची संख्या कमी करून, विशेष करून नोकरशाही संपवण्याच्या आवश्यकतेवर भर दिला आहे. तर अमेझॉनच्या पीपल एक्सपीरियन्स अँड टेक्नॉलॉजीच्या वरिष्ठ उपाध्यक्ष बेथ गॅलेटी म्हणाल्या, "तुमच्यापैकी काही जण कदाचित विचारत असतील की ही एका नवीन युगाची सुरुवात आहे का - जिथे आम्ही दर काही महिन्यांनी मोठ्या कपातीची घोषणा करू. ही आमची योजना नाही."
नोकऱ्यांमध्ये कपात केल्याने हे देखील अधोरेखित होते की एआय कॉर्पोरेट वर्क फोर्सची गतीशीलता कशाप्रकारे बदलत आहे. एआय असिस्टंटमधील लक्षणीय सुधारणा कंपन्यांना नियमित प्रशासकीय कामांपासून ते किचकट कोडिंग समस्यांपर्यंतची कामे जलद आणि अचूकतेने करण्यास मदत करत आहेत, ज्यामुळे याला मोठ्याप्रमाणात स्वीकारल्या जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.