

Indian stock market outlook 2026
esakal
सुहास राजदेरकर - suhas.rajderkar@gmail.com
शेअर बाजारातील सध्याची घसरण ही एक संधी आहे, असे मला वाटते. ज्यांनी आतापर्यंत इक्विटी म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक केलेली नाही, त्यांच्यासाठी गुंतवणुकीची ही अत्यंत चांगली संधी आहे. शेअर बाजार तसेच इक्विटी म्युच्युअल फंड योजनांमध्ये केलेली गुंतवणूक गरज नसताना केवळ बाजार अजून खाली जाईल, या भीतीने मोडू नये आणि कागदावरील तोटा प्रत्यक्षात आणू नये. ज्यांना गुंतवणूक करायची आहे आणि ते पैसे त्यांना किमान तीन वर्षे लागणार नाहीत, त्यांनी म्युच्युअल फंड इक्विटी डायव्हर्सिफाइड योजनांमध्ये ‘एसटीपी’द्वारे गुंतवणूक करणे योग्य ठरेल.
मेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या महिन्याच्या प्रारंभी देशवासियांना उद्देशून केलेल्या आपल्या बहुचर्चित भाषणात काहीही सांगितले असले तरी इराणबरोबरचे युद्ध संपलेले नाही, हे स्पष्ट आहे. आणखी काही दिवसांनंतर परिस्थिती कशी असेल, हे सांगता येत नाही. परंतु, अमेरिका त्यांच्या कर्जाच्या ओझ्यातून वर येत नाही, तोपर्यंत जागतिक स्तरावर अस्थिरता राहणार असे दिसते. आज चीनची या युद्धामध्ये सक्रिय भूमिका नाही. उद्या चीन काय करेल, तेही सांगता येत नाही. या भू-राजकीय परिस्थितीचे पडसाद जगभरातील शेअर बाजारांवर उमटलेले दिसतात.