Mutual Fundsakal
Sakal Money
Mutual Fund: म्युच्युअल फंडातून करा जोखीम व्यवस्थापन!
Investment Strategy: म्युच्युअल फंड गुंतवणुकीत भावनिक निर्णय न घेता योग्य वेळी बाहेर पडणे हेच खरे जोखीम व्यवस्थापन आहे. २०२० ते २०२५ या कालावधीत झालेल्या चढ-उतारांनी गुंतवणूकदारांना ‘रीबॅलन्सिंग’चे महत्व शिकवले.
किरांग गांधी- पर्सनल फायनान्शिअल मेंटॉर
तुम्ही शेअर बाजाराच्या प्रवाहात भरकटत आहात का? की खरोखर आपल्या संपत्तीचे व्यवस्थापन करत आहात? केवळ मागील काळात चांगला परतावा दिला आहे म्हणून तुम्ही अजूनही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक कायम ठेवली आहे का? असेल तर त्यात जोखीम व्यवस्थापनाचे तत्व पाळले जात आहे का?