

Difficulties faced by mutual funds due to foreign investment limits; Common people should also get the opportunity
Sakal
सुहास दंडे, अनुभवी व्यावसायिक
दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेसाठी गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणुकीचे वैविध्यपूर्ण पर्यायांमध्ये विभाजन करणे गरजेचे आहे. आपल्या एकूण गुंतवणुकीपैकी २० ते २५ टक्के रक्कम ही इंटरनॅशनल फंड किंवा ‘गिफ्ट सिटी’च्या मान्यताप्राप्त मार्गांनी परदेशी बाजारात गुंतवली जावी. उदा. पराग पारिख फ्लेक्सी कॅप फंडाने आपल्या एकूण गुंतवणुकीपैकी सुमारे ३५ टक्के रक्कम ॲपल, मायक्रोसॉफ्ट, अल्फाबेट यांसारख्या अमेरिकी कंपन्यांमध्ये गुंतवून भारतीय बाजारातील मंदीच्या काळातही गुंतवणूकदारांना चांगला सरासरी परतावा मिळवून दिला होता. बाजारात मोठी घसरण झाल्यास चांगल्या शेअरमध्ये सवलतीच्या भावात गुंतवणूक करण्यासाठी किंवा आणीबाणीच्या प्रसंगी १५ टक्के रक्कम लिक्विड फंडात असणे गरजेचे आहे.