

ASK Automotive Stock Price Closes at 588 Rupees on Friday Latest Share Market Information and Investor Watchlist Update
sakal
-भूषण ओक, शेअर बाजार विश्लेषक
एएसके ऑटोमोटिव्ह ही देशातील आघाडीची टियर-१ वाहन सुटे भाग उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे. १९८८ मध्ये हरियानातील मानेसर येथे स्थापन झालेली ही कंपनी नोव्हेंबर २०२३ मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाली. सुरुवातीला दुचाकी वाहनांसाठी ब्रेक शूज बनविण्यापासून कंपनीने गेल्या ३७ वर्षांत वाहन उद्योगासाठी विविध प्रकारचे अत्याधुनिक घटक आणि अभियांत्रिकी उपाय पुरविण्यापर्यंत मजल गाठली आहे. कंपनीने स्वतःचे संशोधन, अचूक अभियांत्रिकी, टूलिंग आणि जागतिक तांत्रिक भागीदारी यांच्या मदतीने स्पर्धात्मक क्षमता विकसित केली आहे.