Premium|Axis Bank Branch Banking : डिजिटल वेग, डेटा आणि ‘बुद्धिमान सहानुभूती’च्या जोरावर अ‍ॅक्सिस बँकेचे ब्रँच बँकिंग बदलते रूप

Future of Retail Banking Branches India 2026 : डिजिटल तंत्रज्ञान आणि मानवी कौशल्याचा संगम साधत अ‍ॅक्सिस बँक आपल्या ६,११० शाखांचे 'विश्वास केंद्र' म्हणून रूपांतर करत असून, ग्रामीण भागात 'भारत बँकिंग' धोरणांतर्गत पहिल्यांदाच कर्ज घेणाऱ्यांना मिनिटांत कर्जपुरवठा केला जात आहे.
Axis Bank Branch Banking

Axis Bank Branch Banking

esakal

Updated on

संजीव मोघे

ब्रँच

बँकिंगमधील परिवर्तन महत्त्वाचे!

अ‍ॅक्सिस बँक डिजिटल आणि पारंपरिक बँकिंगचा संगम साधत आपल्या ब्रँच बँकिंग मॉडेलमध्ये मोठे परिवर्तन घडवत आहे. डिजिटल चॅनेलमधील अनुभव, डेटा-आधारित निर्णयप्रक्रिया आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन यांच्या साह्याने शाखांना केवळ व्यवहार केंद्रांपासून विश्वासार्ह सल्लागार आणि सर्वसमावेशक सेवा केंद्रांमध्ये रूपांतरित करण्याचा बँकेचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर, अ‍ॅक्सिस बँकेचे प्रेसिडेंट; तसेच दक्षिण आणि पश्चिम शाखा बँकिंग विभागाचे प्रमुख संजीव मोघे यांची खास ‘सकाळ मनी’साठी ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार वसंत कुलकर्णी यांनी घेतलेली ही मुलाखत...

प्रश्‍न ः सध्याच्या ‘प्रेसिडेंट आणि हेड ब्रँच बँकिंग’ या पदावर येण्याआधी तुम्ही अ‍ॅक्सिस बँकेच्या कार्ड आणि पेमेंट्ससारख्या डिजिटल चॅनेलचे नेतृत्व केले आहे. तो अनुभव अ‍ॅक्सिस बँकेच्या ब्रँच बँकिंगचे नेतृत्व करताना कसा उपयोगी पडतो?

मोघे ः कार्ड आणि पेमेंट्समधील माझ्या अनुभवावरून असे दिसून आले, की ‘डिजिटल’ हे केवळ एका चॅनेलचे प्रतिनिधित्व करत नाही; ते वेग, व्यवसाय वाढविण्याची क्षमता (स्केलेबिलिटी) आणि ग्राहक-केंद्रित धोरणांवर लक्ष केंद्रित करते. पेमेंट क्षेत्रात कार्यक्षमतेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. शाखा बँकिंगमध्ये संक्रमण करताना, मी अखंडतेचे हे तत्त्वज्ञान पुढे नेले आहे. शाखा आता आमच्या ॲपला पूरक ठरतील, याकडे आमचे लक्ष आहे. आमच्या डिजिटल ऑपरेशन्समधील डेटा-चालित वापर आमच्या शाखांशी संवाद वाढविण्यासाठी; तसेच तो अधिक अचूक आणि वैयक्तिक गरजांनुसार तयार करण्यासाठी केला जातो. उदा. आमचा ‘सिद्धी’ प्लॅटफॉर्म आमच्या शाखा सहकाऱ्यांना रिअल-टाइम डेटा समजेल अशा दृष्टीने सुसज्ज करतो, ज्यामुळे ते मानवी कौशल्याने समृद्ध होऊन डिजिटल अल्गोरिदमशी तुलना करतायेण्याजोग्य पद्धतीने ग्राहकांशी संवाद साधू शकतात. फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड ४१ लाखांहून अधिक ग्राहकांपर्यंत विस्तारण्याच्या माझ्या अनुभवाने इकोसिस्टीम भागीदारीचे महत्त्व अधोरेखित केले. मी आता आमच्या शाखांमध्ये हा दृष्टिकोन समाविष्ट करत आहे, जेणेकरून त्या ‘बर्गंडी’ (उच्च व्यवसाय देणाऱ्या ग्राहकांचा वर्ग) ते लहान व्यवसायांसाठी डिझाइन केलेल्या ‘मायक्रो लोन’पर्यंत सर्व सेवा एकत्रित करणारे स्थानिक केंद्र म्हणून कार्य करतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com