
भूषण ओक - शेअर बाजार विश्लेषक
अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात लोक आयुर्वेदाकडे वळताना दिसत आहेत. जीना सिखो लाइफकेअर लि. ही कंपनी पारंपरिक आयुर्वेदाच्या ज्ञानाचा वापर करून भारताला ‘रोगमुक्त, औषधमुक्त भारत’ बनवण्याचे उद्दिष्ट ठेवणारी एक अग्रणी आयुर्वेदिक आरोग्यसेवा कंपनी आहे. ही कंपनी अनेक रुग्णालये आणि दवाखाने चालवते, ज्यामध्ये व्यापक आयुर्वेदिक आरोग्यसेवा दिली जाते. यात मुख्यत्वेकरून आयुर्वेद, पंचकर्म, होमिओपॅथी व निसर्गोपचार या उपचारांचा समावेश आहे. या सेवांमध्ये रोगप्रतिबंधापासून ते उपचार आणि देखभालीपर्यंत आरोग्यसेवेचे विविध टप्पे समाविष्ट आहेत.