Premium|Bank of India Flexi Cap Fund : शेअर बाजारातील अस्थिरतेतही ‘या’ फ्लेक्सी कॅप फंडाची दमदार कामगिरी; गुंतवणूकदारांसाठी पुन्हा संधी?

Flexi Cap Fund Investment : बाजारातील अस्थिरता आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे दबाव असतानाही बँक ऑफ इंडिया फ्लेक्सी कॅप फंडाने दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी आकर्षक संधी निर्माण केली आहे.
Bank of India Flexi Cap Fund

Bank of India Flexi Cap Fund

esakal

Updated on

वसंत कुलकर्णी - vasant@vasantkulkarni.com

कॅलेंडर वर्ष २०२६ मध्ये शेअर बाजारात मोठी अस्थिरता आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री वाढली असली, तरी दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी काही निवडक फंडांनी उल्लेखनीय कामगिरी कायम ठेवली आहे. लार्ज-कॅप कंपन्यांवर भर देत स्थिर आणि दमदार परतावा देणारा बँक ऑफ इंडिया फ्लेक्सी कॅप फंड हा अशाच योजनांपैकी एक असून, गेल्या सहा वर्षांत त्याने गुंतवणूकदारांची संपत्तीनिर्मिती लक्षणीयरीत्या वाढवली आहे. या फंडाचा घेतलेला आढावा...

कॅलेंडर वर्ष २०२६ मध्ये ‘निफ्टी ५००’ने (२० जून २०२६ पर्यंत) तब्बल ३.२० टक्क्यांची (७६५ अंशांची) घसरण नोंदवली आहे. गेल्या काही महिन्यांत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या (एफआयआय) मोठ्या प्रमाणावरील विक्रीमुळे बाजारात मोठी घसरण दिसून आली. या कॅलेंडर वर्षात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी विक्रमी विक्री केल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. मार्च २०२६ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात

देशांतर्गत कंपन्यांची कामगिरी निराशाजनक नसली, तरी उत्साहवर्धकही नव्हती. ग्राहकांचा घटलेला आत्मविश्वास लक्षात घेता, मे महिन्यात म्युच्युअल फंडांत, विशेषतः इक्विटी फंडांतील ओघ लक्षणीयरीत्या घटला आहे. बाजारातील अनेक क्षेत्रांत मोठी घसरण झाली असली, तरी गुंतवणूकदारांसाठी काही ठिकाणी ‘व्हॅल्यू’ अर्थात योग्य किमतीत उपलब्ध संधी दिसून येत आहेत. हे प्रामुख्याने लार्ज-कॅप कंपन्यांमध्ये दिसून येत असले, तरी स्मॉल कॅपमध्येही निवडक आकर्षक मूल्यांकनांवर गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध आहेत. या पार्श्वभूमीवर, लार्ज-कॅप कंपन्यांवर भर देणारा आणि ‘मॉर्निंगस्टार फोर स्टार रेटिंग’प्राप्त बँक ऑफ इंडिया फ्लेक्सी कॅप फंड नव्याने गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून देतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com