

Bankers Books Evidence Act 2026 Key Changes in Bank Records Certification Digital Evidence and Court Procedures Explained
sakal
डॉ. दिलीप सातभाई, ज्येष्ठ चार्टर्ड अकाउंटंट- सीए
बँकर्स बुक्स एव्हिडन्स ॲक्ट १८९१’ हा कायदा अशा उद्देशाने करण्यात आला होता, की कोणत्याही कायदेशीर कार्यवाहीमध्ये बँकेतील मूळ पुस्तके व कागदपत्रे सादर न करता बँकेच्या पुस्तकातील माहितीचा बँकेने प्रमाणित केलेल्या प्रतींचा कायदेशीर पुरावा म्हणून वापर करणे सुलभ व्हावे. हा कायदा अशा काळात करण्यात आला होता, जेव्हा बँकिंग पुस्तके प्रामुख्याने भौतिक स्वरूपात (कागदोपत्री) ठेवली जात असत. डिजिटल बँकिंगच्या विस्तारामुळे बँकिंग पुस्तके आता अधिकाधिक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार, साठवले आणि जतन केले जात आहेत. त्यामुळे सध्याच्या बँकिंग प्रणालीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विद्यमान कायदेशीर आराखडा अद्ययावत आणि बळकट करणे आवश्यक झाले होते. त्यानुसार एक ऑक्टोबर २०२६ पासून बँकर्स बुक्स एव्हिडन्स कायदा २०२६ अमलात आला. हा कायदा बँकिंग नोंदींना न्यायालयीन पुरावा म्हणून वापरण्यासाठी आधुनिक, तंत्रज्ञान-तटस्थ मान्यता देतो.