
"Baroda BNP Paribas Large Cap Fund – 20 years of stability, growth, and investor trust."
Sakal
-वसंत कुलकर्णी, ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार
बडोदा बीएनपी पारिबा लार्ज कॅप फंडाला २३ सप्टेंबर २०२५ रोजी २१ वर्षे पूर्ण झाली. हा फंड सुरू झाल्यापासून १००० रुपयांच्या मासिक गुंतवणुकीचे २५३ हप्ते गेले असून, २.५३ लाख गुंतवणुकीचे तारीख २६ सप्टेंबर २०२५ च्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’नुसार १२.९६ लाख रुपये झाले आहेत. परताव्याचा वार्षिक दर १३.६६ टक्के आहे, तर २१ वर्षांपूर्वी गुंतविलेल्या एकरकमी एक लाख रुपयांचे २१.८२ लाख रुपये झाले असून, परताव्याचा वार्षिक दर १५.८२ टक्के आहे. गुंतवणूकदार दीर्घकालीन म्हणजेच पाच ते सात वर्षे दूर असलेल्या उद्दिष्टांसाठी बडोदा बीएनपी पारिबा लार्ज कॅप फंडाचा विचार करू शकतात.