Premium|Baroda BNP Paribas Mid Cap Fund Performance : शेअर बाजारातील अस्थिरतेत गुंतवणुकीची संधी; 'हा' मिड कॅप फंड ठरू शकतो फायदेशीर

Equity Mutual Fund Trends : जागतिक तणाव आणि अस्थिरतेच्या वातावरणातही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत आहे. मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी मिड कॅप फंड हा एक उत्तम पर्याय असून, बडोदा बीएनपी पारिबा मिड कॅप फंडाची सातत्यपूर्ण कामगिरी गुंतवणूकदारांसाठी आशादायक ठरत आहे.
Baroda BNP Paribas Mid Cap Fund Performance

Baroda BNP Paribas Mid Cap Fund Performance

esakal

Updated on

वसंत कुलकर्णी - vasant@vasantkulkarni.com

जागतिक तणाव, महागाई आणि व्याजदरातील अनिश्चितता यामुळे अलीकडच्या काळात शेअर बाजारात मोठी अस्थिरता पाहायला मिळाली. तरीही, देशांतर्गत मागणीला चालना देणारे घटक आणि अर्थव्यवस्थेची मजबूत पायाभरणी लक्षात घेतल्यास, मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी संधी अद्याप कायम आहेत. अशा परिस्थितीत मिड कॅप फंडांकडे पुन्हा लक्ष वेधले जात असून, सातत्यपूर्ण कामगिरी करणारा बडोदा बीएनपी पारिबा मिड कॅप फंड गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षक पर्याय ठरू शकतो.

दोन दशकांच्या दमदार वाढीनंतर डिसेंबर २०२५ मध्ये ८४,००० अंशांचा टप्पा ओलांडणारा ‘सेन्सेक्स’, जागतिक तणाव आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात ७३,००० अंशांच्या आसपास स्थिरावला. एप्रिलपासून मात्र बाजारात हळूहळू सुधारणा दिसू लागली आहे. एप्रिलअखेर ‘सेन्सेक्स’ ७६,९१३ अंशांवर पोचला.

अमेरिका- इराण तणावासंदर्भातील सकारात्मक-नकारात्मक घडामोडींमुळे बाजारातील अस्थिरता शिगेला पोहोचली आहे. महागाई आणि इंधनदरवाढीमुळे आगामी तिमाहीत कॉर्पोरेट कमाई मंदावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निर्यातीबाबतही काही प्रमाणात अनिश्चितता आहे. तरीसुद्धा, मध्यम ते दीर्घ कालावधीत बाजाराला आधार देणारे अनेक सकारात्मक घटक समोर येत आहेत.

मागणीला चालना देणारे घटक

नवे कमी केलेले प्राप्तिकर दर, जीएसटी कपातीचे परिणाम, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वेतन आयोग, व्याजदरातील संभाव्य कपात आणि तुलनेने नियंत्रित महागाई हे सर्व घटक ग्राहकांची क्रयशक्ती वाढवून देशांतर्गत मागणीला बळकटी देत आहेत. याचे सकारात्मक परिणाम पुढील काळात स्पष्टपणे दिसण्याची शक्यता आहे.

जोखीम असूनही संधी

बाजारातील मोठे चढ-उतार सहन करण्याची क्षमता असलेल्या छोटे गुंतवणूकदार आपल्या पोर्टफोलिओमध्ये मिड कॅप फंडांचे प्रमाण वाढविण्याचा विचार करू शकतात. आज मिड कॅप शेअर स्वस्त नसले आणि त्यांच्या कमाईबाबत काही अनिश्चितता असली तरी या क्षेत्राकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे योग्य नाही. दीर्घकालीन दृष्टीने (२-३ वर्षे किंवा त्याहून अधिक) यात चांगल्या परताव्याची क्षमता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com