
लक्ष्मीकांत श्रोत्री - ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार
गुंतवणुकीमध्ये विविधता असणे गरजेचे आहे, याबद्दल काही दुमत असायचे कारण नाही. परंतु, विविधता किती प्रमाणात असावी हेदेखील माहिती असणे महत्त्वाचे आहे. एका म्युच्युअल फंडामध्ये ५० कंपन्यांचे शेअर असतात आणि तुमच्याकडे २० पेक्षा जास्त फंड असतील, तर याबाबत विचार करण्याची गरज आहे. काहीवेळा कंपन्यांचे शेअर जसे, इन्फोसिसचा शेअर हा ५३०पेक्षा जास्त फंडांच्या पोर्टफोलिओमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर, ज्या गुंतवणूकदारांना अनुभव आहे आणि सुवर्णमध्य हवा आहे, त्यांच्यासाठी ‘बास्केट इन्व्हेस्टिंग’ हा गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय होऊ शकतो.