
कौस्तुभ केळकर
kmkelkar@rediffmail.com
पूर्वीच्या तुलनेत आताच्या काळात परदेश प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अनेक जण विविध कारणांनी परदेश प्रवास करत असतात. या प्रवासाचे कारण कोणतेही असले, तरी आपल्याबरोबर परकी चलन असणे अत्यावश्यक असते. त्यासाठी प्री-पेड फॉरेक्स कार्ड अन्य पर्यायांच्या तुलनेत उपयुक्त आणि किफायतशीर ठरते. त्या कार्डच्या उपयुक्ततेची आणि वैशिष्ट्यांची माहिती घेऊ या.