
Why Bengaluru shops refusing UPI payments: ऑनलाइन पेमेंटद्वारे भारतात व्यवहाराचे मोठमोठे विक्रम होत असताना बंगळुरूत मात्र बहुतांश दुकानदारांनी युपीआय पेमेंट स्वीकारले जाणार नाही असे बोर्डच लावलेत. नो युपीआय, ओन्ली कॅश असं ग्राहकांना स्पष्ट सांगण्यात येतंय. देशाचं आयटी हब असलेल्या बंगळुरूत दुकानदार युपीआय ऐवजी थेट रोख रकमेची मागणी करत आहेत. रोकड नसेल तर दुकानदार सामान देण्यास नकार देत असल्याचे प्रकार समोर येतायत.