

इंडेक्स फंड तुलना: निफ्टी ५० आणि निफ्टी नेक्स्ट ५० कोण जास्त परतावा देतो?
ई सकाळ
मंगेश कुलकर्णी
mangaiishkulkarni@gmail.com
मागच्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांना पसंती दिली आहे. त्यामुळे व्यवस्थापनाखालील मालमत्तेमध्ये साधारण तीनपट वाढ झाली. या दरम्यान इंडेक्स फंडांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेमध्ये तब्बल २५ पट वाढ झाली. इंडेक्स फंडांमध्ये गुंतवणूकदारांनी सर्वाधिक पसंती ‘निफ्टी ५०’ आणि ‘निफ्टी नेक्स्ट ५०’ वर आधारित फंडांना दिली आहे.
यापैकी कोणता इंडेक्स फंड जास्त फायदेशीर आहे, ते जाणून घेऊ या.