
सिद्धार्थ खेमका, (मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लि. )
गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात वेगाने चढ-उतार सुरू आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या आयातशुल्कामुळे प्रामुख्याने अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्ध, अन्य देशांच्या आयात-निर्यातीवर होणारा परिणाम यामुळे जागतिक शेअर बाजारात आणि भारतीय शेअर बाजारातही अस्थिरता दिसून येत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सावधगिरीने व्यवहार करत आहेत. अशा परिस्थितीत मूल्यांकन वाजवी असलेल्या काही उत्तम शेअरच्या खरेदीची संधी उपलब्ध होत आहे. अशा काही शेअरची शिफारस येथे केली आहे.
(उद्दिष्टपूर्तीचा अपेक्षित कालावधी : एक वर्ष)