
सिद्धार्थ खेमका
(मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लि. )
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांचे आयातशुल्क धोरण, भारत आणि ब्रिटनमधील व्यापार करार, पश्चिम आशियातील भू-राजकीय तणाव, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारातील कल; तसेच भारतीय कंपन्यांचे तिमाही आर्थिक निकाल, महागाई यामुळे भारतीय शेअर बाजारात सतत चढ-उतार दिसून येत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार सावध भूमिका घेत असून, मूल्यांकनाबाबत सजग असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर, सध्या कोणते शेअर खरेदीसाठी योग्य आहेत, याची शिफारस येथे केली आहे.