

Is Financial Independence the Only Measure of Self-Worth?
sakal
-डॉ. सुवर्णा बोबडे, समुपदेशक व मानसशास्त्रज्ञ
अनेक घरांमध्ये जास्त पैसे कमावणारा जास्त महत्त्वाचा आणि कमी किंवा पैसे न कमावणारा कमी महत्त्वाचा, हे समीकरण दिसतं. पण हे समीकरण खरंच इतकं सहज आहे का?...
डाॅक्टर, माझा नवरा चांगला माणूस आहे. घरात कोणतीही कमतरता ठेवत नाही. पण एक गोष्ट मला सतत टोचत राहते... मी मुलं लहान असताना नोकरी सोडली. तो निर्णय आम्ही दोघांनी मिळून घेतला होता. त्या वेळी घरात कुणी तरी पूर्णवेळ असणं गरजेचं होतं. आता मुलं मोठी झाली. पण घर, गुंतवणूक, मालमत्ता, मोठी खरेदी अशा आर्थिक निर्णयांमध्ये नवरा माझं मत विचारतच नाही. मी विचारलं तर म्हणतो- पैसे मी कमावले आहेत. शेवटी निर्णय माझाच असणार!’’ समुपदेशनासाठी आलेली स्त्री बोलत होती. तिच्या डोळ्यांत राग, अपमान आणि निराशा स्पष्ट दिसत होती.