

bharat taxi
Sakal
Bharat Taxi Booking Process : ओला आणि उबरला टक्कर देण्यासाठी ‘भारत टॅक्सी’ ही नवी सहकारी टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली आहे. वाहन चालकांना अधिक फायदा मिळावा यासाठी ही योजना आणण्यात आली असून सध्या दिल्ली आणि गुजरातमध्ये ही सेवा सुरू आहे. पुढील काळात ही सेवा देशभरात सुरू करण्याची तयारी आहे. मेट्रो शहरांपासून ते इतर शहरांपर्यंत ओला, उबर आणि रॅपिडोला टक्कर देण्यासाठी भारत टॅक्सी मैदानात उतरली आहे.