

Government Relief for Small Entrepreneurs Brings New Opportunities for Small Businesses Growth Investment and Development
sakal
-ॲड. गोविंद पटवर्धन, ज्येष्ठ करसल्लागार
भारतीय अर्थव्यवस्थेत सूक्ष्म, छोट्या, मध्यम उद्योजकांचे (एमएसएमई) योगदान महत्त्वाचे आहे. अशा प्रत्येक उद्योजकाची मोठ्या उद्योगांकडून मोठी ऑर्डर मिळावी, अशी मनोमन इच्छा असते. मात्र, अनेकदा असा अनुभव येतो, की काही ना काही कारण सांगून बिलाची रक्कम वेळेवर दिली जात नाही. मोठी ऑर्डर जाण्याची भीती असल्याने फार आग्रही वा आक्रमक भूमिका घेऊन दुखावता येत नाही. मात्र, यामुळे खेळते भांडवल अडकून पडते; त्याचा व्यवसायावर गंभीर परिणाम होतो. छोट्या, मध्यम उद्योजकांना ही समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावते. यावर तोडगा म्हणून सरकारने कायदे केले आहेत; पण ते फारसे प्रभावी ठरलेले नाहीत. नुकतेच संसदेत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग कायदा सुधारणा विधेयक मंजूर झाले आहे. त्याचा एक उद्देश बिलवसुली समस्या सोडविणे हा आहे.