
डॉ. वीरेंद्र ताटके - गुंतवणूक विषयाचे अभ्यासक
अतिश्रीमंतांच्या यादीत वर्णी लागावी यासाठी एका बाजूला जगभरातील श्रीमंतांची स्पर्धा सुरू असताना मायक्रोसॉफ्ट या जगप्रसिद्ध कंपनीचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी मात्र, त्यांच्या संपत्तीविषयी वेगळाच निर्णय घेऊन सर्वांना धक्का दिला आहे. खरं तर, पन्नास वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या माध्यमातून जगभरातील अतिश्रीमंत व्यक्तींच्या यादीत गेट्स यांचा सातत्याने समावेश झाला आहे. १९८६ या वर्षी आलेल्या मायक्रोसॉफ्टच्या आयपीओमधून जमा झालेल्या संपत्तीतून सर्वांत तरुण अब्जाधीश होण्याचा मानदेखील त्यांना मिळाला होता. दुसऱ्या बाजूला त्यांच्या दातृत्वाच्या कहाण्यादेखील नेहमीच चर्चिल्या गेल्या आहेत आणि आता त्यांनी घेतलेल्या निर्णयाने त्यात भर पडली आहे.