BMC Budget Explained: Where Mumbai’s Municipal Money Comes From Ahead of Elections
eSakal
Sakal Money
BMC Budget : देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेचे बजेट किती? कुठून येतो एवढा पैसा?
BMC Election : राज्यात १५ जानेवारीला महानगरपालिकांच्या निवडणूक असल्याने वातावरण गरम आहे. यात सर्वाचे लक्ष्य लागून आहे तब्बल ६०,००० कोटी बजेट असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेकडे.
BMC Revenue : महाराष्ट्रात १० वर्षानंतर महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहे. १५ जानेवारीला राज्यातील तब्बल २९ महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळख असणारी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) विशेष चर्चेत आहे. कारण, आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये BMC चा अर्थसंकल्प सुमारे ५९,९५४ कोटी रुपये होता, जो दिल्ली आणि बेंगळुरू या दोन्ही महानगरपालिकांच्या एकत्रित बजेटपेक्षा जास्त आहे.

