Premium|Herbal Alley Ayurvedic brand : १७ वर्षे प्राध्यापिका राहिल्यानंतर सुरू केला स्वतःचा ब्रँड; डोंबिवलीच्या डॉ. कविता कामत यांची 'हर्ब ॲली' यशोगाथा

Women Entrepreneurs in Ayurvedic Cosmetics : वनस्पतिशास्त्रात पीएच.डी. केलेल्या आणि १७ वर्षे प्राध्यापिका म्हणून काम करणाऱ्या डोंबिवलीच्या डॉ. कविता कामत यांनी कोविड काळात सुरू केलेल्या 'हर्ब ॲली' या आयुर्वेदिक व नाविन्यपूर्ण ब्रँडची यशोगाथा.
Herbal Alley Ayurvedic brand

Herbal Alley Ayurvedic brand

esakal

Updated on

सुधीर जोगळेकर - sumajo51@gmail.com

वनस्पतिशास्त्र आणि संबंधित विषयांमध्ये पीएच.डी.पर्यंतचे शिक्षण घेऊन नंतर तब्बल १७ वर्षं असिस्टंट प्रोफेसर म्हणून अध्यापन केलेल्या डोंबिवलीच्या डॉ. कविता कामत यांच्या ‘हर्ब अ‍ॅली’ या ब्रँडची ही गोष्ट. कोविड महासाथीच्या काळात घरच्या प्रयोगशाळेत केलेल्या उटण्याचा पहिला प्रयोग यशस्वी झाला आणि त्यातूनच त्यांच्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली गेली. छोट्या प्रमाणावर बनवलेली तेलं, फेसक्रीम्स अशा आयुर्वेदिक उत्पादनांना ग्राहकांची पसंती मिळत गेली आणि त्यातून जन्माला आला

‘हर्ब अ‍ॅली’ नावाचा त्यांचा ब्रँड...

डोंबिवलीतील टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी विद्यार्थी स्वतःला अभिमानाने ‘आम्ही टिळकपंथी’ असं नुसतं म्हणवून घेत नाहीत; त्यांचं ते टिळकप्रेम, त्यांची ती स्वदेशनिष्ठा, त्यांचा तो अस्सल भारतीयत्वाचा बाणा त्यांच्या व्यवहारात, त्यांच्या उद्योग-व्यवसायात पुरेपूर जाणवतो आणि प्रकटही होतो. या सदरातील सलग तीन परिचय अशा टिळकपंथीयांचे करून देण्याचा योग योगायोगाने साधून आलेला नाही. फेब्रुवारीत पार पडलेल्या टिळकनगर शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या ‘आवर्तन’ या संमेलनाच्या निमित्ताने यातल्या दोघांचा- डॉ. विक्रांत कुलकर्णी आणि डॉ. कविता कामत यांचा सन्मान शाळेने घडवून आणला होता, तर तिसऱ्याचं, त्याच्या भारतीयत्वाच्या बाण्याला न्याय देणारं ‘महाभारतसृष्टी’ हे पुस्तक याच काळात प्रसिद्ध झालं होतं.

विक्रांतने आपल्या सागरी पर्यावरणाच्या अभ्यासातून समुद्रात आढळणाऱ्या शैवालावर संशोधन करून अत्यंत पौष्टिक असं शैवाल शहरी भागात निर्माण करण्याचं तंत्र विकसित केलं आणि त्यापासून सैनिकांना-खेळाडूंना-अवकाशयान प्रवाशांना उपयोगी पडेल असं ‘स्पिरुलिना’ तयार केलं. महाभारतातलं एकेक पात्र हे दिसायला ऐतिहासिक असलं, तरी ते आजच्या घडीला वास्तवात आढळणाऱ्या मानवी स्वभावांशी आणि व्यवहारांशी जवळीक साधणारं आहे. त्यामुळे त्यातल्या एकेकापासून प्रेरणा घेऊन त्या त्या व्यक्तीच्या स्वभावानुरूप उद्योग-व्यवसाय सुरू करता येतात, हे सूत्र मनात बाळगून वैभव केळकर आणि डॉ. मेघना दलाल या दोघा शाळकरी सहकाऱ्यांनी उद्योगमालिका सुरू केली. त्यांचा परिचय दुसऱ्या लेखात करून दिला होता. या महिन्यातला परिचय आहे तिसऱ्या व्यक्तिमत्त्वाचा- डॉ. कविता कामत यांचा...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com