

BRICS digital push could strengthen the Indian rupee
Sakal
गौरव बोरा, शेअर बाजार विश्लेषक
भारताने २०२६ मध्ये चौथ्यांदा ‘ब्रिक्स’चे अध्यक्षपद भूषवले असून, १२ व १३ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे १८ वी ब्रिक्स शिखर परिषद झाली. ‘ब्रिक्स’मध्ये ११ देश असून, हे देश जगाच्या सुमारे ४९.५ टक्के लोकसंख्येचे, ४० टक्के जागतिक एकूण देशांतर्गत उत्पादनाचे आणि २६ टक्के जागतिक व्यापाराचे प्रतिनिधित्व करतात. यामुळे भारताने केवळ एका आंतरराष्ट्रीय समूहाचे अध्यक्षपद भूषवलेले नाही, तर जागतिक अर्थव्यवस्था, व्यापार, वित्तीय व्यवस्था आणि उदयोन्मुख देशांच्या भविष्यातील आर्थिक दिशेला आकार देण्याची संधी मिळवली आहे.