Britannia News: तुम्हीही ब्रिटानियाचा ब्रेड खाता? ‘100% Whole Wheat’ दाव्यामुळे कंपनीला 1 लाखांचा दंड!

Britannia Bread ₹1 Lakh Penalty for Misleading ‘100% Whole Wheat Bread’ Advertisement: ब्रिटानिया इंडस्ट्रीजला ‘100% Whole Wheat Bread’ दाव्याप्रकरणी CCPA ने 1 लाखांचा दंड ठोठावला आहे. ब्रेडमध्ये गव्हाच्या पिठाचं प्रमाण किती होतं आणि कारवाई का झाली, जाणून घ्या.
Britannia Bread News: Company Fined ₹1 Lakh Over ‘100% Whole Wheat’ Claim

Britannia Bread News: Company Fined ₹1 Lakh Over ‘100% Whole Wheat’ Claim

eSakal

Updated on: 

Britannia fined ₹1 lakh over its whole wheat bread claim: आपल्या रोजच्या आहारात समावेश असणाऱ्या ब्रिटानिया कंपनीबाबत एक महत्त्वाची अपडेट आली आहे. ब्रिटानिया इंडस्ट्रीजला ब्रेडवरील ‘100% Whole Wheat’ म्हणजेच '100 टक्के पूर्ण गहू' अशी जाहीरात केल्याप्रकरणी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) कारवाई केली आहे. यानुसार कंपनीवर 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि अनुचित व्यापार पद्धतींशी संबंधित नियमांचं उल्लंघन झाल्याचं नमूद करत ही कारवाई करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com