

BSE's Historic Stock Performance
Sakal
मकरंद विपट - ‘सेबी’ रजिस्टर्ड रिसर्च अॅनालिस्ट
मुंबई शेअर बाजार (बीएसई लि.) हा मुंबईतील दलाल स्ट्रीट येथे स्थित एक प्रमुख भारतीय शेअर बाजार (स्टॉक एक्स्चेंज) आहे. ही कंपनी इक्विटी, चलने, कर्ज साधने, डेरिव्हेटिव्ह आणि म्युच्युअल फंडांमध्ये व्यापार करण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देते. आशियातील पहिले स्टॉक एक्स्चेंज, बीएसई, १८७५ मध्ये स्थापन झाले. कंपनीने १९८६ मध्ये ‘एस अँड पी बीएसई सेन्सेक्स’ निर्देशांक विकसित केला, ज्यामुळे कंपनीला एक्स्चेंजच्या एकूण कामगिरीचे मोजमाप करण्याचे साधन मिळाले. कंपनी २०१७ मध्ये देशातील पहिली नोंदणीकृत स्टॉक एक्स्चेंज बनली. फेब्रुवारी २०१७ मध्ये ‘बीएसई’च्या शेअरची १२० रुपयांवर (बोनस आणि डिव्हिडंड ॲडजस्टेड भाव) नोंदणी झाली. कोरोना काळात या शेअरने ३१ रुपयांची नीचांकी पातळी दाखवली.