
Business Planning Made Simple: The Role of Vision in Growth
E sakal
Raise the Bar: How Entrepreneurs Can Achieve Long-Term Goals
चकोर गांधी
chakorgandhi@gmail.com
धंदा हा वाढला पाहिजे, मोठा झाला पाहिजे, अशी प्रत्येक व्यापाऱ्याची, व्यावसायिकाची इच्छा असते. मात्र, ही वाढ कशी करायची, याची अनेकांना माहिती नसते. व्यवसायवृद्धीसाठी एक महत्त्वाची गुरुकिल्ली आहे, ती म्हणजे मोठी स्वप्ने पाहणे, मोठे ‘व्हिजन’ ठेवणे आणि यादिशेने शिस्तबद्ध पद्धतीने काम करणे. आपल्या व्यवसायात किती, कशी आणि किती कालावधीत वाढ अपेक्षित आहे, याचा एक दृष्टिकोन असणे आवश्यक आहे. भविष्याचा वेध घेऊन दूरदृष्टीपणाने केलेले नियोजन वाढ घडवू शकते. हे काम प्रत्येक व्यावसायिकाचे असते.