Amazon India Layoffs : अमेझॉनचा पुन्हा दणका! भारतातील ५०० कर्मचाऱ्यांना दिला नारळ - रिपोर्ट

कंपनीने आपल्या वेब सर्व्हिसेसच्या विविध भागांमधील कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे.
Amazon Layoffs
Amazon LayoffsEsakal

गेल्या काही महिन्यांपासून कित्येक मोठमोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. ई-कॉमर्स आणि टेक कंपनी असलेल्या अमेझॉननेही आतापर्यंत जगभरातील आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. यातच आता कंपनीने भारतातील सुमारे ५०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याचे वृत्त समोर आले आहे. इकॉनॉमिक टाईम्सने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

कंपनीने आपल्या वेब सर्व्हिसेसच्या विविध भागांमधील कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार अमेझॉनने मार्चमध्येच आपल्या ९ हजार कर्मचाऱ्यांना लेऑफ करण्याची घोषणा केली होती. सध्या काढण्यात आलेले ५०० कर्मचारी हा याच टप्प्याचा भाग असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

यावर्षी मार्च महिन्यात अमेझॉनने आपल्या क्लाऊड, जाहिरात आणि ट्विच विभागांमधील ९ हजार कर्मचाऱ्यांना काढण्याची घोषणा केली होती. कंपनीचे सीईओ अँडी जेसी यांनी याबाबत माहिती दिली होती. सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता आपण हा निर्णय घेत असल्याचे जेसी यांनी स्पष्ट केले होते. "सध्याची अर्थव्यवस्था अगदीच अनाकलनीय आहे, भविष्यात टिकून रहायंच असेल तर आम्हाला हे कठीण पाऊल उचलावंच लागेल" असं त्यांनी आपल्या मेमोमध्ये म्हटलं होतं.

Amazon Layoffs
OTT platforms : 'खबरदार जर यापुढे...' Netflix, Amazon Prime, Disney Hotstar, Zee5 ला गंभीर इशारा!

शेअर्समध्ये केली कपात

यापूर्वी एप्रिल महिन्यात अमेझॉनने आपल्या व्हिडिओ गेम विभागातील १०० कर्मचाऱ्यांना कढून टाकले होते. यासोबतच, एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे, की अमेझॉन आपल्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या शेअर्समध्येही कपात करत आहे. यासाठी अमेझॉन आपल्या पेमेंट मॉडेलमध्येही बदल करण्याच्या विचारात आहे. कर्मचाऱ्यांना पगारामध्ये शेअर्सऐवजी जास्तीत जास्त कॅश देण्याचा कंपनीचा विचार आहे. यामुळे कंपनीच्या शेअर्सची किंमत कमी होण्याला आळा बसेल, असं रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलं होतं.

Amazon Layoffs
Job Opportunities: खुशखबर! या वर्षी देशातील ७७ टक्के कंपन्या करणार मेगाभरती, नवीन जागा होणार तयार

आतापर्यंत हजारो कर्मचाऱ्यांना दणका

अमेझॉनने यावर्षी आतापर्यंत सुमारे २७ हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले आहे. जानेवारीमध्ये कंपनीने एकाच वेळी १८ हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला होता. त्यानंतर मार्च महिन्यात आणखी ९ हजार कर्मचाऱ्यांच्या लेऑफची घोषणा कंपनीच्या सीईओंनी केली होती.

Amazon Layoffs
AI Job Losses: जगभरात नोकर कपात होत असताना Zerodha CEO म्हणतात, आम्ही कोणालाही कामावरुन...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com