AI Job Losses: जगभरात नोकर कपात होत असताना Zerodha CEO म्हणतात, आम्ही कोणालाही कामावरुन...

आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे भविष्यात नोकऱ्या कमी होण्याची भीती लोकांना आहे.
AI Job Losses
AI Job LossesSakal

AI Job Losses: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे भविष्यात नोकऱ्या कमी होण्याची भीती लोकांना आहे. काही दिवसांपूर्वी, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी न्यूयॉर्क टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, अनेक मोठ्या कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि मशीन लर्निंगवर आधारित तंत्रज्ञानाद्वारे त्यांचे उत्पादन वाढवत आहेत आणि नवीन उत्पादने तयार करत आहेत.

स्टॉक ब्रोकिंगमध्ये काम करणाऱ्या Zerodha कंपनीने AI धोरण जाहीर केले आहे. मात्र या घोषणेसोबतच कंपनीचे सहसंस्थापक नितीन कामथ यांनीही त्यांच्या टीममधील कोणत्याही कर्मचाऱ्याच्या नोकरीला धोका नसल्याचे सांगितले.

Zeordha ने आपल्या दैनंदिन कामकाजात AI ला अतिशय अनोख्या पद्धतीने स्वीकारले आहे. असेही नितीन कामथ यांनी सांगितले.

AI Job Losses
Ashneer Grover: अश्नीर ग्रोव्हरचा आणखी एक धमाका, बनवली 81 कोटींची नोट, काय आहे भारताचा रजीश बँड?

Zerodha ने AI धोरण जाहीर केले:

दोन वर्षांपूर्वी जेव्हा AI तंत्रज्ञानाची जगभरात चर्चा होऊ लागली, तेव्हा Zerodhaचे सह-संस्थापक नितीन कामथ यांना असे वाटले होते की ते फारसे फायदेशीर ठरणार नाही.

पण, आता त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून माहिती दिली आहे की Zeordha देखील AI धोरण स्वीकारत आहे. यासाठी Zerodhaने एक खास नियम तयार केले आहेत.

जेणेकरून कर्मचाऱ्यांना त्यांची संपूर्ण माहिती मिळू शकेल आणि त्यांच्या टीमला AI चा वापर केल्यामुळे त्यांना नोकरी गमावण्याचा धोका किंवा भीती राहणार नाही.

नितीन कामथ यांनी ट्विटमध्ये काय लिहिले आहे?

नितीन कामथ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, आम्ही आमच्या टीममधून कोणालाही काढून टाकणार नाही कारण आम्ही नवीन तंत्रज्ञानाचा स्विकार केला आहे. कामथ यांनी पुढे असा इशारा दिला की अनेक कंपन्या माणसांच्या जागी एआयचा वापर करतील.

ते म्हणाले की या प्रक्रियेत कंपन्या अधिक कमाई करतील आणि त्यांच्या भागधारकांना चांगला परतावा देखील देतील. यामुळे विषमता वाढेल. एआयचा खरा प्रभाव लगेच दिसणार नाही त्यासाठी काही वर्षे लागतील, असा विश्वासही कामथ यांनी व्यक्त केला.

AI Job Losses
Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com