Zomato ला नवी ओळख मिळाली! कंपनीचे नाव बदलले, आता 'या' नावाने ओळखले जाणार, सीईओने सांगितलं कारण
Zomato New Name: ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोने आपले नाव बदलून इटरनल केले आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने त्याला मान्यता दिली आहे. कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली.
फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटोने आपली ओळख बदलली आहे. झोमॅटोचे नाव बदलण्याच्या निर्णयाला कंपनीच्या संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. झोमॅटोच्या बोर्डाने त्यांचे नाव बदलण्यास मान्यता दिली आहे आणि कंपनीचे नाव बदलून इटरनल लिमिटेड करण्याचा निर्णय घेतला आहे.