Meta Lay Off : मेटाने उडवली कर्मचाऱ्यांची झोप! पुन्हा 10,000 कर्मचाऱ्यांना देणार नारळ

Meta to lay off 10000 employees in second round of job cuts says CEO Mark Zuckerberg
Meta to lay off 10000 employees in second round of job cuts says CEO Mark Zuckerberg

Meta to lay off 10000 employees : जगभरातील कंपन्यांकडून नोकर कपात केली जात आहे. यादरम्यान फेसबुकची पॅरेंट कंपनी मेटा ही येत्या काळात पुन्हा १० हजार कर्मचाऱ्यांना नारळ देऊ शकते. यापूर्वी गुगल आणि ट्विटर या बड्या टेक कंपन्यांनी अनेक कर्मचाऱ्यांना नोकरीहून काढले आहे. मेटाने देखील काही कर्मचाऱ्यांना घरी पाठवले आहे.

मंगळवारी मेटाने कंपनी 10,000 नोकर्‍या कमी करेल अशी घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी 11,000 कर्मचार्‍यांना पदमुक्त केल्यानंतर अवघ्या चार महिन्यांत टेक कंपनीने मोठ्या नोकरकपातीची दुसरी फेरी जाहीर केली आहे.

मेटाने चार महिन्यांपूर्वी 11 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार मेटाचे मुख्य कार्यकारी आधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी कर्मचाऱ्यांना एक संदेश दिला आहे ज्यामध्ये त्यांनी कंपनी कर्मचारी कपात करणार असल्याची माहिती दिली आहे. झुकरबर्गने यापूर्वीच नोकरकपातीचे संकेत दिले होते.

Meta to lay off 10000 employees in second round of job cuts says CEO Mark Zuckerberg
महाकाल मंदिर पुजाऱ्याच्या १७ वर्षीय मुलाची मंदिरात तलवारबाजी; नंतर अचानक मृत्यू, पाहा Video

मेटा सीईओ मार्क झुकेरबर्गने आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या संदेशात म्हटले आहे की, आम्ही आमच्या टीमची संख्या 10,000 ने कमी करणार आहोत. यासोबतच ज्यांच्यासाठी आजवर भरती करण्यात आलेली नाही, अशी 5 हजार पदे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Meta to lay off 10000 employees in second round of job cuts says CEO Mark Zuckerberg
Baba Ramdev News : 12वी पास असो की पोस्ट ग्रॅज्युएट… बाबा रामदेव तरुणांना बनवणार संन्यासी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com