महाकाल मंदिर पुजाऱ्याच्या १७ वर्षीय मुलाची मंदिरात तलवारबाजी; नंतर अचानक मृत्यू, पाहा Video

Mahakal Temple  priests 17 year-old son died of a heart attack after performing sword fighting watch video
Mahakal Temple priests 17 year-old son died of a heart attack after performing sword fighting watch video

Mahakal Temple Priest Son Died : तरुण वयातील लोकांचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशीच एक दुःखद बातमी मध्य प्रदेशातील उज्जैन शहरातील मंदिरातून समोर आली आहे.

उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराचे पुजारी मंगेश शर्मा यांचा 17 वर्षीय मुलगा मयंक याचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. दरवर्षी रंगपंचमीला मंदिरात तलवारबाजी केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये मयंक तलवारबाजी करताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये काय दिसत आहे

हा व्हिडिओ महाकाल मंदिर परिसरातील आहे, ज्यामध्ये आकाशी निळा शर्ट आणि पांढरी पँट घातलेला मयंक हातात एक लांब तलवार धरून पारंपारिक पद्धतीने तलवारबाजीचे कौशल्य दाखवत आहे. सुमारे 16 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये मयंक पूर्ण उत्साहाने तलवारबाजी करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे करताना मयंकला अस्वस्थ वाटू लागले. या कारणास्तव तो घरी परतला. त्यानंतर त्याचा घरीच मृत्यू झाला.

हेही वाचा - देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

Mahakal Temple  priests 17 year-old son died of a heart attack after performing sword fighting watch video
Baba Ramdev News : 12वी पास असो की पोस्ट ग्रॅज्युएट… बाबा रामदेव तरुणांना बनवणार संन्यासी

मयंकने घरी आल्यावर त्याने घाबरल्यासारखे वाटत असल्याचे सांगितले. त्याच्या चेहऱ्यावर देखील घाम दिसत होता. कुटुंबीयांना काहीतरी अघटित होण्याची भीती वाटल्याने त्यांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. मयंक हा वडिलांसोबत मंदिरातील पूजेच्या कामात मदत करत असे. मयंक हा अजूनही दहावीत शिकत होता. त्याला दोन बहिणी आहेत. त्यांच्या निधनामुळे मंदिरातील सर्व पुजाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

Mahakal Temple  priests 17 year-old son died of a heart attack after performing sword fighting watch video
Prasad Lad News : विधानपरिषेदत हक्कभंग समितीच्या अध्यक्षपदी प्रसाद लाड यांची निवड

सायलेंट हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मयंकचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला. साधारणपणे असा हृदयविकाराचा झटका मधुमेही रुग्णाला येतो, ज्यामध्ये अटॅक आल्यानंतर लगेच मृत्यू होत नाही. तसेच रुग्णाला हृदयविकाराचा झटका आला आहे असे वाटत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com