LinkedIn Layoffs : लिंक्डइनमध्ये देखील नोकरकपात! इतक्या कर्मचाऱ्यांना दाखवणार बाहेरचा रस्ता

Microsoft-owned company LinkedIn to fire 716 employees  shut down China-focused job search app
Microsoft-owned company LinkedIn to fire 716 employees shut down China-focused job search app esakal

LinkedIn Layoffs : अमेरिका आणि युरोपमधील मंदीचा तंत्रज्ञान क्षेत्रातील नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. अलिकडच्या काळात, Google , Meta, Amazon , Twitter इत्यादी सारख्या अनेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

आता या यादीत मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनच्या मालकीच्या लिंक्डइन या कंपनीचा देखील समावेश झाला आहे. बिझनेस प्रोफेशनल्ससाठी असलेली सोशल मीडिया साइटने 716 कर्मचार्‍याना काढून टाकण्याची घोषणा केली आहे. यासोबतच कंपनीने ते आपले चायनीज जॉब ऍप्लिकेशन अॅप देखील बंद करणार असल्याचे सांगितले आहे.

विशेष म्हणजे लिंक्डइनमध्ये एकूण 20,000 हून अधिक कर्मचारी काम करतात. गेल्या वर्षी प्रत्येक तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. अशा स्थितीत नफा वाढल्यानंतरही नोकर कपातीचा निर्णय घेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, लिंक्डइनने जागतिक परिस्थिती पाहता कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Microsoft-owned company LinkedIn to fire 716 employees  shut down China-focused job search app
Bus Accident News : पुलावरून बस कोसळली! १५ जण ठार तर २५ जखमी; बचावकार्य सुरू

सीईओ काय सांगतात?

लिंक्डइनचे मुख्य कार्यकारी अधिकारी रायन रोस्लान्स्की (Ryan Roslansky) यांनी कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवून माहिती दिली आहे की बदलत्या वातावरणात आम्ही आमच्या ग्लोबल बिझनेस ऑर्गनायझेशन (जीबीओ) मध्ये मोठे बदल केले आहेत आणि चायनीज जॉब अॅप्लिकेशन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

यानंतर कंपनीतील एकूण 716 लोकांच्या नोकऱ्यांवर परिणाम होणार आहे. त्यांनी सांगितले की सेल्स, ऑपरेशन आणि सपोर्ट टीममध्ये छाटणी केली जाईल जेणेकरून कोणताही निर्णय लवकर घेता येईल.

Microsoft-owned company LinkedIn to fire 716 employees  shut down China-focused job search app
Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंची सत्ता राहाणार की जाणार? सत्तासंघर्षावर कायदेतज्ज्ञांनी वर्तवल्या 'या' शक्यता

250 लोकांना नोकऱ्या दिल्या जाणार आहेत

छाटणी व्यतिरिक्त, सीईओंनी नवीन नोकऱ्यांबद्दल देखील माहिती दिली आहे. कंपनीत केलेल्या बदलांनंतर एकूण 250 नोकऱ्या निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अशा परिस्थितीत ज्या कर्मचाऱ्यांची नोकरी गेली आहे, तेही या पदांसाठी अर्ज करू शकतात.

कंपनीने 9 ऑगस्ट 2023 पर्यंत आपले चीनी जॉब ऍप्लिकेशन अॅप InCareer चे ऑपरेशन्स पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सीईओ रोस्लान्स्की म्हणाले की, सुरुवातीला InCareer ने चांगले यश मिळवले, परंतु या बदलत्या जागतिक वातावरणात हे अॅप बंद करणे LinkedIn साठी फायदेशीर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com